(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Charan Waghmare Bhandara : भाजपने काढल्यानंतर आमदार चरण वाघमारे महाविकास आघाडीच्या वाटेवर?
Charan Waghmare Bhandara : भाजपने काढल्यानंतर आमदार चरण वाघमारे महाविकास आघाडीच्या वाटेवर?
भंडारा जिल्ह्यातील तुमसर विधानसभा मतदार संघातील एक मोठा राजकीय चेहरा म्हणून माजी आमदार चरण वाघमारे यांच्याकडं बघितलं जातं. भंडाऱ्यात आमदार परिणय फुके यांची एन्ट्री झाल्यानंतर चरण वाघमारे आणि त्यांच्या कधी जमलं नाही. त्यानंतर पक्ष विरोधी कारवाई केल्याचा वाघमारे यांच्यावर ठपका ठेवतं भाजपानं त्यांना पक्षातून काढलं. त्यानंतर आता त्यांची आगामी विधानसभा निवडणूक लढण्याची तयारी सुरू झालेली आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेत दोन वेगवेगळे गट स्थापन झाल्यानंतर ही निवडणूक चुरशीची होणार आहे. राज्यातील गाजा वाटपाचा फॉर्म्युला तयार असला तरी, कुठल्याही पक्षाचा त्यावर अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही. अशात भंडारा जिल्ह्यातील तुमसर विधानसभा मतदार संघावर सध्या अजित पवार गटाचे आमदार असतानाही भाजपनं यावर दावा केलेला आहे. तर, शरद पवार गटानं ही तुमासरची जागा मिळावी यासाठी आग्रह धरला आहे. तर, दुसरीकडं काँग्रसनंही या जागेवरील दावा सोडलेला नाही. अशात कार्यकर्त्यांच्या भरोषावर या क्षेत्रावर सुरुवातीपासून चरण वाघमारे यांनी पकड ठेवलेली असून त्यांनी विधानसभा लढण्याची तयारी सुरू केलेली आहे. चरण वाघमारे हे महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या संपर्कात आहेत. भाजपमधून काढल्यानंतर ते आता जोपर्यंत परीणय फुके भाजपात आहे तोपर्यंत भाजपमध्ये जाणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. आज तुमसर येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसन्मान यात्रा येत आहे. या यात्रेच्या निमित्तत्यानं राजू कारेमोरे यांच्या प्रचाराचा नारळ फोडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आता चरण वाघमारे कुठल्या पक्षाकडून लढते याकडे सर्वांच्या नजरा लागल्या असल्या तरी आगामी काळात ते तुतारी हातात घेत महाविकास आघाडीच्या माध्यमातून महायुतीच्या उमेदवारासमोर मोठं आव्हान देण्याच्या तयारीत आहेत.