Maharashtra : विद्यापीठ कायद्याविरोधात भाजयुमो आक्रमक, मंत्र्यांच्या बंगल्यांबाहेर आंदोलन
ठाकरे सरकारनं मंजूर केलेल्या विद्यापीठ सुधारणा विधेयकाविरोधात भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी रात्री मंत्री आणि खासदारांच्या निवासस्थानासमोर आंदोलन केलं. मुंबई, नागपूर आणि परभणीत भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करून विद्यापीठ सुधारणा विधेयकाला विरोध दर्शवला. मंत्रालयासमोर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या शासकीय बंगल्यासमोर भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी रांगोळी काढून विधेयकाविरोधात निषेध नोंदवला. तर नागपूरमध्ये पालकमंत्री नितीन राऊत यांच्या रवीभवन कॉटेज क्रमांक 5 या शासकीय निवासस्थानी भाजयुमो कार्यकर्त्यांनी रांगोळी काढून आंदोलन केलं. तर परभणीत शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांच्या कार्यालयाबाहेरही असंच आंदोलन करण्यात आलं. नव्या विधेयकानुसार राज्यपालांच्या अधिकारांना कात्री लावण्यात आलीय. त्याला विरोध करत भाजपनं आंदोलन सुरु केलंय.





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
