BJP: 'हिंदुराष्ट्र' च्या ट्विटवरून भाजपमध्ये अस्वस्थता? ट्विटच्या चौकशीचे मुनगंटीवार यांचे संकेत
abp majha web team
Updated at:
15 Apr 2023 09:13 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई : भारत हा हिंदुराष्ट्र होता हिंदुराष्ट्र आहे आणि हिंदुराष्ट्र राहिल... भाजपच्या (BJP) अधिकृत ट्विटर हँडलवरुन पोस्ट झालेल्या या ट्विटमुळे, भाजपमध्येच अस्वस्थता निर्माण झाली आहे. कारण भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवर यांनी, भाजपचा असा कोणताही अजेंडा नसताना, असं ट्विट कुणी आणि का केलं? हे समोर येईलच, असं वक्तव्य केलं आहे त्यामुळे भाजपच्या सोशल मीडिया सेलमधून अशी पोस्ट चुकून केली? की जाणूनबूजून केली गेली? असे प्रश्न समोर आले आहेत.