Biparjoy Storm Konkan : बिपरजॉय चक्रीवादळाचा कोकण किनारपट्टी भागात परिणाम, वाऱ्याचाही वाढला वेग
abp majha web team
Updated at:
10 Jun 2023 12:54 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबिपरजॉय चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टी भागात वातावरणात बदल जाणवूू लागलेत. ढगाळ वातावरण तसंच वाऱ्याचा वेग वाढलेला दिसून येतोय. त्यामुळे पावसाची शक्यता वर्तवण्यात येतेय.. बिपरजॉय चक्रीवादळाने रत्नागिरीतील गणपतीपुळे या ठिकाणी समुद्राला उधाण आलं होतं.. काही ठिकाणी समुद्राला सध्या उधाण आलं नसलं तरी वाऱ्याचा वेग वाढलेला दिसून येतोय... त्यामुळे सध्या किनारपट्टी भागामध्ये जिल्हा प्रशासनानं मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. बिपरजॉय चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने राज्यातल्या किनारपट्टी भागामध्ये अलर्ट जारी केलाय.