Bihar Child Trafficking : बिहारमधून आणलेल्या 58 मुलांची रवानगी सुधारगृहात
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppBihar Child Trafficking : बिहारमधून आणलेल्या 58 मुलांची रवानगी सुधारगृहात
बिहारमधून आलेल्या ५८ मुलांची रवानगी सुधारगृहात रवानगी करण्यात आलीय.. तर मनमाड रेल्वे पोलिसांनी काल अटक केलेल्या 4 आरोपींना 12 दिवसांची तर भुसावळ रेल्वे पोलिसांच्या ताब्यातील एका आरोपीला कोर्टाने 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावलीय. रेल्वे पोलिसांकडून या पाचही संशयित आरोपीची कसून चौकशी केली जातेय. या आरोपींकडून काल 58 अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आलंय. सध्या ही मुले जळगाव आणि नाशिकच्या निरीक्षणगृहात आहेत. सध्या या सर्व मुलांचा रेल्वे पोलिसांसोबतच बाल कल्याण समितीकडूनही जबाब नोंदवला जातोय. त्यानंतर या मुलांना पालकांच्या स्वाधीन केलं जाणाराय. सूत्रांनी दिलेल्या माहीतीनुसार यातील अनेक मुलांची जन्मतारीख सारखीच आहे. तसेच काहींना तर आपल्याला कुठे नेण्यात येत होतं याचंही उत्तरं देता आलेलं नाही.