Worli Hit and Run Special Report : पुन्हा बड्या बापाच्या पोरानं निरपराधांना उडवलं

Worli Hit and Run Special Report : पुन्हा बड्या बापाच्या पोरानं निरपराधांना उडवलं

मुंबई: वरळी हिट अँड रन केसची (Worli Hit And Run Case) घटनेनंतर महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग (Excise Department) ॲक्शन मोडमध्ये आलं आहे. महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून जुहू परिसरात वाईस ग्लोबल बारवर कारवाईला सुरुवात केली आहे. वाईस ग्लोबल तपास बारमधून आरोपी मिहीर शाह शनिवारी रात्री आपल्या मित्रांसोबत दारू पार्टी करून बाहेर निघाला होता. त्यानंतर आरोपीकडून वरळी परिसरात हिट अँड रान केसची घटना घडली आणि त्यामध्ये एका महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे. 

मुंबई पोलिसांसोबत आता राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईला देखील वेग आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दोन टीम बारमध्ये सध्या माहिती घेऊन कारवाई करत आहे. बारमध्ये महाराष्ट्र शासनाच्या सर्व नियमाचं पालन केलं जात होतं का आणि हा बार रात्री उशिरापर्यंत चालू होता का या संदर्भात देखील माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून घेतली जात आहे.

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola