Bhiwandi अल्पवयीन विद्यार्थाला 70 सेकंदात 70 काठीचे फटके, मारहाण करणारा शिक्षक फरार : ABP Majha
भिवंडी शहरातील मिल्लत नगर भागात मदरशात शिक्षण घेणाऱ्या एका १४ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थाने केवळ पाठांतर व्यवस्थित करीत नसल्याच्या कारणावरून मदरशातील मौलवी शिक्षकाने अमानुषपणे मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. खळबळजनक बाब म्हणजे त्या अल्पवयीन विद्यार्थाला ७० सेकंदात ७० काठीचे फटके मारताना व्हिडिओ व्हायरल झाला आहे. याप्रकरणी तीन महिन्यानंतर निजामपुरा पोलीस ठाण्यात विविध कालमानुसार मौलवी शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फहाद भगत नुरी असं गुन्हा दाखल झालेल्या मौलवी शिक्षकाचे नाव असून तो फरार झाला आहे. १४ वर्षीय पीडित विद्यार्थी हा भिवंडी शहरातील मिल्लत नगर भागात असलेल्या दारुल उलूम हसनैन करीमॅन 'दिनी मदारशात शिक्षण घेत आहे.


















