Punjab : पंजाबमध्ये भगवंत मान आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा, केजरीवाल यांनी केली घोषणा
Continues below advertisement
पंजाबमध्ये भगवंत मान आम आदमी पक्षाकडून मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असतील. दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनी भगवंत मान यांच्या नावाची घोषणा केली. पंजाबच्या नागरिकांचा फोनवर कल जाणून घेत आपने मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरवलाय. भगवंत मान यांना फोनद्वारे 21 लाख 59 हजार नागरिकांनी पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून पसंती दर्शवली होती. म्हणजेच 93 टक्के नागरिकांनी मान यांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून कल दिल्याची माहिती केजरीवाल यांनी दिलीय. पंजाबमध्ये आपचं सरकार येणारच असा विश्वासही केजरीवाल यांनी व्यक्त केलाय. भगवंत मान यांच्या नावाची घोषणा होताच चंदीगडमध्ये जल्लोष सुरु झालाय.
Continues below advertisement