Ashadhi Ekadashi Wari 2021 : बारामतीच्या काटेवाडीत पार पडणारं मेंढ्यांचा रिंगण यंदा मंदिरात
बारामतीच्या काटेवाडीत पार पडणारं मेंढ्यांचा रिंगण सोहळा यंदा ही पार पडला. पण तो देहूतील संत तुकाराम महाराजांच्या मंदिरात. इतिहासात पहिल्यांदाच हा रिंगण सोहळा पार पडला. कोरोनामुळं पालखी सोहळा हा मंदिरातच मुक्कामी आहे. त्यामुळे संस्थानने यंदा रिंगण सोहळा मंदिरातच घेण्याचा निर्णय घेतला. प्रत्येक वर्षी बारामतीच्या काटेवाडीत दुपारच्या विसावा झाला की पालखी गावाबाहेर येते. धनगर समाजाचे मेंढपाळ आपल्या मेंढ्यांना घेऊन तिथं पोहचलेले असतात. मग सर्व मेंढ्या पालखी रथाला तीन प्रदक्षिणा घालतात. व्यवसायात भरभराट यावी आणि रोगराईपासून मेंढ्यांचे संरक्षण व्हावे या श्रद्धेपोटी हे रिंगण घातले जाते. गेल्या वर्षी यात खंड पडला होता, यंदा मात्र थेट मंदिरातच हा ऐतिहासिक रिंगण पार पाडण्यात आला. तुकोबांच्या पालखी सोहळ्यातील हा अविस्मरणीय असा क्षण आहे.


















