![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Amol Mitkari On Ajit Pawar : महायुतीत दादांचं खच्चीकरण सुरू; पुढे काय म्हणाले अमोल मिटकरी ?
Amol Mitkari On Ajit Pawar : महायुतीत दादांचं खच्चीकरण सुरू; पुढे काय म्हणाले अमोल मिटकरी ? राज्याच्या राजकारणातून एक अतिशय मोठी बातमी आहेय..... अजित पवारांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांसोबत जावं, असं खळबळजनक वक्तव्य राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी केलीये. अकोला येथे 'एबीपी माझा'शी साधलेल्या 'एक्सक्लूझिव्ह' संवादादरम्यान त्यांनी ही मागणी केलीय. दरम्यान, हे आपलं वैयक्तिक मत असलं तरी पक्षानं यावर विचार करण्याची मागणी त्यांनी केलीये. महायुतीत अजितदादांना एकटं पाडण्याचा प्रयत्न होतोये. काहीही करून त्यांनी महायुती सोडावी यासाठी दोन्ही मित्र पक्षातील काही लोक प्रयत्न करीत असल्याचा आरोप मिटकरींनी केलाय. यासाठी काही लोक मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी व्यक्त केलाय. अजित पवार आणि प्रकाश आंबेडकर एकत्र आले तर विधानसभा निवडणुकीत हे दोन्ही नेते महाराष्ट्राचं राजकारण बदलवून शकतील असा आशावादही त्यांनी व्यक्त केलाय. आमदार मिटकरींशी 'एक्सक्लूझिव्ह' संवाद साधलाय प्रतिनिधी उमेश अलोणे यांनी...
![ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 28 June 2024](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/28/15aac827ed929ded8aaee1795ff678a81719513646777976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Special Report Uddhav Thackeray, Devendra Fadnavis Meet : फडणवीस-उद्धव ठाकरे लिफ्ट भेटीत काय घडलं ?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/28/118c175f8c46a9841abf4a337f2a5e4b1719513294995976_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Special Report Eknath Khadse :भाजप प्रवेश वेटिंगवर असल्यानं खडसे असवस्थ ? वरिष्ठ काय भूमिका घेणार ?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/27/f698d23911d64760b6304be4b12115041719512985818976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Zero Hour : मुख्यमंत्रीपदावरून राऊतांच्या 'त्या' वक्तव्यावर मित्रपक्षांना काय वाटतं ?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/27/b9bb3bae1fa8407f23d3547fa00833811719512459018976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Zero Hour : दादांचे आमदार काकांच्या वाटेवर ? राष्ट्रवादीच्या आमदारांनी घेतली जयंत पाटलांची भेट ?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/27/39ab0341a4d34410157b755b237233601719511525119976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)