Amol Deshmukh Vs Sunil Kedar : केदारांच्या सावनेर मतदारसंघावर देशमुख कुटुंबाचा दावा
Amol Deshmukh Vs Sunil Kedar : केदारांच्या सावनेर मतदारसंघावर देशमुख कुटुंबाचा दावा
काँग्रेसचे दिग्गज नेते सुनील केदार यांच्या सावनेर मतदारसंघावर काँग्रेस मधूनच वेगळी दावेदारी करण्यात आली आहे... आणि ही दावेदारी दुसऱ्या कोणाची नाही, तर केदार घराण्याशी जुनं राजकीय वैर असलेल्या देशमुख कुटुंबातून करण्यात आली आहे.... काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष रणजित देशुमख यांचे चिरींजीव डॉ. अमोल देशमुख यांनी सावनेर मतदारसंघातून पक्षाकडे उमेदवारी मागत मी केदार - देशमुख या अत्यंत जुन्या राजकीय वादावर पडदा टाकून सुनील केदार यांच्यापुढे मैत्रीचा हात ठेवल्याचं मत व्यक्त केलं आहे... सुनील केदारसोबत पूर्वी स्थानिक निवडणुकांमध्ये मी सहकार्याने काम केले आहे... राजकारणात एकेकाळी केदार - देशमुख वाद होता.. मात्र मी केदारांसमोर हात ( मैत्रीचा हात ) दिला आहे.. यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये ही त्यांना मदत केली आहे... अशा रीतीने अनेक पातळ्यांवर सुनील केदार यांच्यासोबत काम केले आहे... बँक घोटाळ्यात दोषी सिद्ध झाल्यानंतर न्यायालयाच्या निर्णयामुळे सध्या तरी ते निवडणूक लढवण्यास अपात्र आहे.. पुढे काय होईल हे ही अस्पष्ट आहे.. त्यामुळे त्यांनी मला लहान भावासारखे मानून काँग्रेस पक्षाचा सहकारी मानून मोठ्या मनाने संधी द्यावी अशी अपेक्षा असल्याचे अमोल देशमुख म्हणाले... जेव्हा केव्हा संधी मिळेल सुनील केदार यांना भेटणार आणि बोलणार असे ही अमोल देशमुख म्हणाले... दरम्यान, सावनेर आणि देशमुख कुटुंबाचा ही जुनं नातं असून माझे वडील रणजीत देशमुख यांचा तो जुना मतदारसंघ आहे... वडिलांचे अनेक कार्यकर्ते आजही सावनेरमध्ये असून माझ्या सोबत काम करणारे कार्यकर्तेही मोठ्या संख्येने तिथे आहे... त्यामुळे सावनेर मतदार संघावर मला माझा हक्क वाटतो, पक्षश्रेष्ठी न्याय करतील अशी अपेक्षा असल्याचे ही अमोल देशमुख म्हणाले... दरम्यान, सावनेर अमोल देशमुख यांचे मोठे बंधू आणि सध्या भाजपचे नेते असलेल्या आशिष देशमुख यांचा ही जुना मतदारसंघ आहे... आशिष देशमुख हे ही सावनेर मधून भाजपच्या तिकीट वर निवडणूक लढवू शकतात अशी दात शक्यता आहे... त्यामुळे अमोल देशमुख यांनी काँग्रेसमधून सावनेरवर दावा केल्याने दोन्ही भावांमध्ये लढत होण्याची ही शक्यता आहे... मात्र, आशिष देशमुख आधीच सावनेर मतदार संघ सोडून गेले आहे... त्यानंतर सुनील केदार यांच्या बँक घोटाळा प्रकरणी न्यायालयीन निर्णय आल्याने मी सावनेर मधून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे... आशिष देशमुख सावनेर मधून भाजपचे उमेदवार राहतील का याचा निर्णय त्यांचा पक्ष करेल... काँग्रेस पक्षाचा निर्णय काँग्रेसचे नेते करतील... भविष्यात काय होईल हे आज सांगता येणार नाही... त्यामुळे सावनेर मध्ये दोन्ही भावांमध्ये राजकीय संघर्ष होईल का हे पक्षश्रेष्ठी आणि देवावर सोडतो, देव रस्ता काढेल त्याप्रमाणेच पुढे जाऊया अशी प्रतिक्रिया अमोल देशमुख यांनी दिली आहे.. माझ्या वडिलांचा आणि कुटुंबाचा पूर्ण पाठिंबा माझ्या पाठीशी असल्याचा दावा ही त्यांनी केला आहे.. Gfx In कोण आहे डॉ. अमोल देशमुख, आणि त्यांच्या सावनेरवरील दाव्याचा राजकीय महत्व काय ??? # अमोल देशमुख काँग्रेसचे तत्कालीन दिग्गज नेते आणि माजी प्रदेशाध्यक्ष रणजित देशमुख यांचे चिरींजीव.. # वैद्यकीय तज्ज्ञ असलेले डॉ. अमोल देशमुखांनी जगातील नामांकित रुग्णालयात तसेच युद्द आणि यादवी असलेल्या देशात वैद्यकीय सेवा दिली आहे... # 2012 पासून ते काँग्रेसच्या वेगवेगळ्या संघटनात्मक कामांमध्ये सक्रिय असल्याचा त्यांचा दावा... # काँग्रेसच्या अडचणीच्या काळात ही काँग्रेस सोडली नाही, त्यामुळे पक्ष श्रेष्ठ संधी देतील अशी पक्षाकडून अपेक्षा.. # सावनेर मतदारसंघ अमोल देशमुखांचे वडील रणजित देशमुखांचा जुना मतदारसंघ # रणजित देशमुख सावनेर मधून १९८५ आणि १९९० असे दोन वेळा आमदार # सावनेर मधून अमोल देशमुख यांचे मोठे बंधू आशिष देशमुख यांनी ही भाजप उमेदवार म्हणून निवडणूक लढविली... # आता अमोल देशमुख सावनेरसाठी इच्छुक असल्याने वडिलांच्या जुन्या मतदारसंघात दोन्ही भाऊ वेगवेगळ्या पक्षातून समोरासमोर येण्याची शक्यता... # सावनेर वरील अमोल देशमुखांच्या दाव्याने सुनील केदारांच्या अडचणी वाढण्याची शक्यता... # केदार - देशमुख राजकीय संघर्ष नव्या वळणावर जाईल की कायमचा मिटेल असा प्रश्न....