![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
घोटाळा काय झाला ते तर दाखवा, जरंडेश्वर कारखान्यावरुन आरोप करणाऱ्यांना अजित पवार यांचं आव्हान
पुणे : साताऱ्यातील जरंडेश्वर कारखान्याची विक्री ही मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार झाली होती, त्यामध्ये कारखान्यातील संचालक मंडळाचा कोणताही हात नव्हता असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. ईडीने कारखान्यावर केलेली ही कारवाई पहिलीच नाही, या आधीही अशा कारवाया झाल्या आहेत, त्यातून काहीही निष्पन्न झालं नसल्याचं अजित पवारांनी सांगितलं.
कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी साताऱ्यातील जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्यावर ईडीने कारवाई केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सत्तेचा गैरवापर करुन या कारखान्याची विक्री केल्याचा आरोप शालिनीताई पाटील यांनी केला होता.
उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कारखान्याची विक्री झाल्याचं सांगत अजित पवार म्हणाले की, "उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर हा कारखाना बीव्हीजी कंपनीने चालवायला घेतला. पण त्यांना पहिल्या वर्षी मोठं नुकसान झाल्यानं माझ्या एका नातेवाईकाने, राजेंद्र घाडगे यांनी तो चालवायला घेतला. रितसर परवानग्या घेऊन त्यांनी हा कारखाना चालू केला होता. 300 ते 400 कोटी रुपयांचे कर्ज त्यांनी हा कारखाना उभा करण्यासाठी काढले होते. परंतु ईडीने त्यावर टाच आणली. आता ही टाच का आणली याच्या खोलात मी जात नाही. एखाद्या एजन्सीला चौकशी करण्याचा पूर्ण अधिकार आहे. यापूर्वी सीआयडी, एसीबी यांनी चौकशी केली आहे. त्यात त्यांना काही आढळले नाही. पण ईडीने नेमकी कशासाठी चौकशी सुरु केली हे अद्याप कळाले नाही."
अनेक कामगारांचे भवितव्य या कारखान्यावर अवलंबून आहे. त्यामुळे वकिलाचा सल्ला घेऊन कंपनीवर असणारे डायरेक्टर कोर्टात जातील असंही अजित पवारांनी सांगितलं.
![Top 100 Headlines Superfast News 8PM 07 July 2024](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/07/557eb0bffa5bf9843701d2c0444e75631720371926329976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Eknath Shinde on Uddhav Thackeray | जे गेटमधून बाहेर निघत नव्हते ते शेताच्या बांधावर पोहोचले, शिंदेंची टीका](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/07/d61a9aaa517279415658fecd65ecdc2c1720368374771976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Manoj Jarange Parbhani : लोकसभेत धडा मिळाला, आता अंत पाहू नका, मराठा महिलांचा सरकारला इशारा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/07/fe296fd3774cf16ddfb52632429fa3271720367631847976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Sambhajiraje chhatrapatil on Vishalgad : विशाळगड अतिक्रमण मुक्त करा, संभाजीराजेंची मागणी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/07/a2285520c003e5f9ea58259c048723161720367117982976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Manoj Jarange Parbhani :](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/07/8fb3f02d9a1f510d76799f046b404e701720366555206976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)