एक्स्प्लोर
AI Blackmail: परभणीत अल्पवयीन तरुणीवर AI तंत्रज्ञानाने अत्याचार
परभणी जिल्ह्यातील सेलू येथे अल्पवयीन तरुणीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एआय तंत्रज्ञानाचा वापर करून हा प्रकार घडला आहे. तरुणीच्या शेजारी राहणाऱ्या शिक्षकाने तिचे कपडे बदलतानाचा व्हिडिओ चोरून काढला. या व्हिडिओचा वापर करून शिक्षकाने तिला वारंवार धमकावले आणि तिच्यावर अत्याचार केले. एवढेच नाही, तर एआय तंत्रज्ञानाचा वापर करून तिचे फोटो तयार करूनही तिला ब्लॅकमेल करण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत शिक्षकासह एका अल्पवयीन मुलीला आणि तिच्या साथीदाराला ताब्यात घेतले आहे. तिघांवरही पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे तंत्रज्ञानाच्या गैरवापराबद्दल चिंता व्यक्त होत आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास सुरू केला आहे.
महाराष्ट्र
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
आणखी पाहा




















