Ahmednagar Water Shortage : अहमदनगरमध्ये पिण्याचं पाणीही विकत घेण्याची वेळ, नागरिकांचं आंदोलन
Ahmednagar Water Shortage : अहमदनगरमध्ये पिण्याचं पाणीही विकत घेण्याची वेळ, नागरिकांचं आंदोलन
अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांवर सध्या पिण्याचं पाणी विकत घेण्याची वेळ आलीय. प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यात ३१२ टँकर सुरु करण्यात आले आहेत. सर्वाधिक ९९ पिण्याच्या पाण्याचे टँकर हे पाथर्डी तालुक्यात सुरु करण्यात आले आहेत, मात्र पिण्याच्या पाण्याचे टँकर देखील ५ ते ५ दिवस येत नाही. त्यामुळे पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी दिली आहे. दरम्यान पाथर्डी तालुक्यातील पागोरी पिंपळगाव इथल्या नागरिकांनी पाण्यासाठी थेट तहसील कार्यालयासमोर उपोषण आंदोलन केलं. प्रशासनाकडून लेखी आश्वासन मिळाल्याने नागरिकांनी आंदोलन मागे घेतलं.






















