Ahmednagar ST Strike : एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याने अहमदनगरच्या तारकपूर बस स्थानकावर शुकशुकाट.
Ahmednagar ST Strike : एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याने अहमदनगरच्या तारकपूर बस स्थानकावर शुकशुकाट.
सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन मिळावे, प्रलंबित महागाई भत्ता आणि वेतन फरक मिळावा या आणि अशा इतर मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे... ऐन सणासुदीच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याने वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे...आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे काल अहमदनगर विभागातील एकूण 377 फेऱ्या पैकी 217 फेऱ्या सुरू होत्या तर 160 फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या...अहमदनगर विभागातील श्रीरामपूर, शेवगाव, अकोले आणि कोपरगाव डेपो पूर्णपणे बंद होते आज सकाळपासून अहमदनगर येथील तारकपूर बस स्थानकावर शुकशुकाट पाहायला मिळत आहे...आढावा घेतलाय आमचे अहमदनगर प्रतिनिधी सुनिल भोंगळ यांनी.





















