Smart Bulletin : स्मार्ट बुलेटिन : 26 ऑक्टोबर 2021 : मंगळवार : ABP Majha
1. क्रुझ ड्रग्ज पार्टीप्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडेंची आजच चौकशी होण्याची शक्यता, एनसीबीचं दक्षता पथक आज मुंबईत येणार, वानखेडे दिल्लीत दाखल..
2. प्रभाकर साईल यांच्या आरोपानंतर किरण गोसावी शरण येण्यासाठी लखनऊ पोलिसांकडे, लखनऊ पोलिसांचा गोसावीला ताब्यात घेण्यास नकार, पुणे पोलिसांचं एक पथक लखनऊकडे रवाना
3. मुंबई उच्च न्यायालयात आर्यन खानच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, सुटका होणार का? याकडे लक्ष
4. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत राज्यात प्रथमच दैनंदिन बाधितांची संख्या हजाराच्या खाली, दिवसभरात 889 नवे रुग्ण, मृत्यूच्या संख्येतही घट
5. एसटीच्या तिकीट दरात 17 टक्क्यांची भाडेवाढ, मध्यरात्रीपासून नवे दर लागू तर एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात पाच टक्क्यांनी वाढ
6. रश्मी शुक्ला यांच्याविरोधात तपासयंत्रणेकडे सबळ पुरावे, राज्य सरकारची हायकोर्टात माहिती
7. 28 तारखेपासून मध्य आणि पश्चिम रेल्वेवर 100 टक्के क्षमतेनं लोकल फेऱ्या चालवणार, प्रवासी वाढल्याने रेल्वे प्रशासनाचा निर्णय
8. मुंबईत गार्डनमध्ये खेळत असताना खड्ड्यात पडून 2 मुलांचा मृत्यू, ॲंटॉप हिलमधील घटना, कठडे नसल्यानं जीव गमावावा लागला
9. मी आणि समीर जन्मानं हिंदूच, कधीही धर्म बदलला नाही, मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणातील नवाब मलिकांच्या आरोपांना अभिनेत्री क्रांती रेडकरचं प्रत्त्युत्तर
10. आयपीएलच्या रणांगणात लखनौ आणि अहमदाबाद या दोन नव्या टीम्स.. आरपीजी आणि सीव्हीसी कॅपिटल्स या दोन उद्योग समूहांची यशस्वी बोली



















