ABP Majha Headlines : 8 PM : 28 March 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppABP Majha Headlines : 8 PM : 28 March 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
शिवसेना शिंदे गटाची पहिली यादी जाहीर, पहिल्या यादीत ८ जणांचा समावेश, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिंदेंच्या शिवसेनेच्या यादीत कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदेंचं नाव नाही, तर यादीत नाशिक, ठाणे, वाशिम- यवतमाळ या जागांवरील उमेदवारांचा समावेश नाही
अभिनेता गोविंदा आहुजाचा शिंदे गटात प्रवेश, लोकसभेच्या तिकिटाबाबत गोविंदाची कोणतीही अट नाही, तर निवडणुकीत स्टार प्रचारक म्हणून काम करतील, मुख्यमंत्र्यांची माहिती
ठाणे लोकसभेची जागा भाजपला मिळावी यासाठी देवेंद्र फडणवीस कमालीचे आग्रही, मात्र बालेकिल्ला असल्यानं ठाण्याची जागा आम्हालाच मिळावी, एकनाथ शिंदेंची भूमिका
लोकसभा जागावाटपावरुन शिंदे गटातले अनेक नेते भाजपवर नाराज, निगेटिव्ह सर्व्हेचं कारण देत खच्चीकरण, अनेक नेत्यांची भावना, तर कोणतेही मतभेद नाहीत, भाजपचं स्पष्टीकरण