ABP Majha Headlines : 02 PM : 26 August 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात दीपक केसरकर यांची मोठी घोषणा, मुख्याध्यापिका, वर्ग शिक्षिका आणि दोन्ही सेविकांवर पॉक्सो अंतर्गत कारवाई करण्याची शिफारस
महिला अत्याचार रोखण्यासाठी सर्व शाळांमध्ये पॅनिक बटण बसवणार,शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची माहिती..बदलापूर घटनेतल्या आरोपीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी.
संभाजीनगरमध्ये आदित्य ठाकरेंच्यासमोर भाजप कार्यकर्त्यांची निदर्शनं, कालच्या मोदींच्या दौऱ्यादरम्यान दानवेंनी केलेल्या घोषणाबाजीचा बदला घेतल्याची चर्चा
पैठणमध्ये मराठा आंदोलकांनी अडवला आदित्य ठाकरेंचा ताफा, ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देण्याबाबत भूमिका स्पष्ट करण्याची मागणी
पुण्यात महायुतीच्या नेत्यांमध्ये बेबनाव, भूमीपूजनाच्या कार्यक्रमावरून मुळीक आणि टिंगरेंची एकमेकांवर टीका, अजितदादा म्हणाले, कार्यक्रम वरच्या पातळीवर ठरला.
विधानसभा निवडणुकीचा प्रचार मुख्यमंत्री शिंदेंच्या नेतृत्त्वात, मुख्यमंत्रिपदाचा निर्णय मात्र निवडणुकीनंतर, भाजप खासदार अशोक चव्हाण यांची स्पष्टोक्ती
मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वी रात्रभर मुंबई-गोवा महामार्गाची डागडूजी, थातुरमातुर कामं करुन किती दिवस काढणार असा प्रश्न...
नाशिक शहरात गोदावरीची पूरस्थिती कायम, पालकमंत्री दादा भुसेंनी घेतला आढावा