Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्या : 13 Sep 2024

Continues below advertisement

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्या : 13 Sep 2024 
केंद्रीय निवडणूक आयोगाचं पथक सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्रात येणार,  विधानसभा निवडणूक घोषित करण्यापूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाचे  पथक राज्याचा आढावा घेणार.
भाजपच्या अंतर्गत सर्व्हेत विदर्भात महायुतीला २५ जागा, भाजपला १८ जागा , एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला ५ जागा व अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला २ जागा, त्यातही नागपूर जिल्ह्यात भाजपला केवळ ४ जागा मिळत असल्याची सूत्रांची माहिती. 
महायुतीतील 75 टक्के जागावाटपावर मतैक्य,  चंद्रशेखर बावनकुळेंचा दावा, जिंकून येण्याची क्षमता असलेला पक्षच ती जागा लढवणार, कोणत्याही जागांवर आग्रह करायचा नाही असं ठरल्याचीही बावनकुळेंची माहिती. 
विधानसभेसाठी काँग्रेसचे राज्य, जिल्हा,मतदारसंघ पातळीवर तीन जाहीरनामे, मुस्लीम समाजाकडेही जाहीरनाम्यात विशेष लक्ष, कर्नाटक, तेलंगणाप्रमाणे महाराष्ट्रातही काँग्रेसच्या विविध गॅरंटी. 
वर्ध्याच्या कारंजा शहरात राहुल गांधी यांचा पुतळा जाळत भाजपकडून निषेध आंदोलन, आमदार दादाराव केचे ,सुधीर दिवे यांनी राहुल गांधींच्या प्रतीकात्मक पुतळ्याला जोडे मारत जाळला पुतळा.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram