Sindhudurg : Scuba Divingसाठी अत्याधुनिक बोट तारकर्लीत दाखल, मंत्री आदित्य ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
abp majha web team
Updated at:
21 Feb 2022 06:09 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appस्कूबा डायव्हिंगसाठी एक खास अत्याधुनिक बोट सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या तारकर्लीत दाखल झालीय.. आज पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंच्या हस्ते या बोटीचं उद्घाटन करण्यात आलं. या नव्या बोटीमुळे साहसी पर्यटकांना अधिक रोमांचकारी पर्यटनाचा आनंद घेता येणार आहे.. जल पर्यटनाच्या क्षेत्रात भारतातील पहिली सुसज्ज आणि अत्याधुनिक बोट सामील करण्याचा मान एमटीडीसीला मिळालाय.. या नव्या बोटीमुळे निवती रॉकजवळीक समुद्री तळाचे अंतरंग न्याहाळता येणार आहेत.. या बोटीवर स्कुबा डायव्हिंग करणाऱ्या पर्यटकांसाठी चेंजिंग रूम, प्रशस्त डेक आणि केबिन, लाईफ सपोर्ट यंत्रणा, उत्तम आसन व्यवस्था आहे.