Coronavirus : राज्यात Omicron चे 4 नवे रुग्ण, उस्मानाबादमध्ये 2, बुलढाण्यात 1 नवा रुग्ण
abp majha web team
Updated at:
16 Dec 2021 09:23 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppCorona Variant Omicron : जगाची धाकधुक वाढवणाऱ्या ओमायक्रॉननं आता देशातही हातपाय पसरवण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्र आणि केरळात बुधवारी ओमायक्रॉन व्हेरियंटची लागण झालेले प्रत्येकी 4-4 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर तामिळनाडूमध्येही ओमायक्रॉनची लागण झालेला प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे. सध्या देशात ओमायक्रॉनचे 73 रुग्ण आहेत. तर यापैकी सर्वाधिक 32 रुग्ण महाराष्ट्रात आहेत.