Buldhana : 1 विद्यार्थी 1 वृक्ष मोहिमेला सुरुवात, 5 लाख 14 हजार विद्यार्थी मोहिमेत सहभागी: ABP Majha
बुलढाणा जिल्ह्यात एक विद्यार्थी एक वृक्ष या अभिनव मोहिमेची 15 ऑगस्ट पासून सुरुवात झाली आहे. जिल्हा प्रशासन, शिक्षण विभाग आणि सामाजिक वनिकरण यांच्या संयुक्त पुढाकाराने संपूर्ण बुलडाणा जिल्ह्यात 'एक विद्यार्थी एक वृक्ष' ही अभिनव वृक्ष क्रांती मोहीम शालेय विद्यार्थ्यांच्या सहकार्याने राबवण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी एस.रामामुर्थी यांच्या हस्ते या मोहिमेची सुरुवात झाली. या वृक्षक्रांती मोहिमेत प्रत्येक विद्यार्थ्याला एक मोफत रोप देण्यात येणार आहे. या मोहिमेत जिल्हाभरातील 5 लाख 14 हजार विद्यार्थी सहभागी होणार आहेत. शालेय विद्यार्थ्यानी हे झाड लावून त्याच संवर्धन करणार आहेत. या मोहिमेत सहभागी होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना शालेय स्तरावर विशेष गुण देण्यात येणार आहेत. या मोहिमेत सर्व शाळांच्या विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावं असं आवाहन करण्यात आलंय.




















