एक्स्प्लोर
Kolhapur : कोल्हापुरात जैन समाजाचा मोर्चा, सम्मेद शिखरजी पर्यटनस्थळ घोषित केल्याच्या निषेध
झारखंड सरकारने जैन धर्मियांचे पवित्र स्थळ असणाऱ्या सम्मेद शिखरजी या धार्मिक स्थळाला पर्यटन स्थळाचा दर्जा दिलाय. तो दर्जा रद्द करून शिखरजीला धार्मिक स्थळाचा दर्जा द्यावा यासाठी कोल्हापुरात जैन बांधवानी मोठा मोर्चा काढला आहे. या मोर्चात मोठ्या संख्येनं जैन बांधव सहभागी झाले आहेत.. हजारोच्या संख्येनं जैन बांधव रस्त्यावर उतरल्यामूळे कोल्हापूर शहरातील मुख्य रस्ते ब्लॉक झालेत. सरकारने संमेद शिखरजी या स्थळाला पर्यटनाचा दिलेला दर्जा रद्द करून धार्मिक स्थळाचा दर्जा कायम ठेवावा अशी मागणी जैन बांधवानी लावून धरली आहे.
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















