Kolhapur Aurangzeb Photo Issue: 'ते' स्टेटस ठेवणारे सर्व आरोपी अल्पवयीन !
Kolhapur Aurangzeb Photo Issue: 'ते' स्टेटस ठेवणारे सर्व आरोपी अल्पवयीन ! कोल्हापूरमध्ये काल मोठा राडा झाला. टिपू सुलतान आणि औरंगजेबाचे फोटो स्टेटसमध्ये ठेवल्यानं हिंदुत्ववादी आक्रमक झाले होते. मात्र आता या प्रकरणाची एक वेगळीच बाजू समोर आली आहे. व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवण्याबाबत अटक केलेले सर्वच्या सर्व आरोपी अल्पवयीन आहेत. यामागे मोठं षड्यंत्र असल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. कारण, अल्पवयीन मुलांना होणारी शिक्षा ही तुलनेनं कमी असते, न्यायव्यवस्थाही अनेकदा त्यांच्याकडे सहानुभूूतीच्या नजरेनं पाहते. याचाच गैरफायदा घेण्यासाठी अल्पवयीन मुलांची माथी भडकवून त्यांना हे स्टेटस ठेवायला भाग पाडण्यात आलं का, याचा तपास सुरू आहे.





















