Ajit Pawar on Sharad Pawar Kolhapur: मी उजळ माथ्याने फिरणारा कार्यकर्ता, मला लपून जाण्याचं काय कारण?
Ajit Pawar on Sharad Pawar Kolhapur: मी उजळ माथ्याने फिरणारा कार्यकर्ता, मला लपून जाण्याचं काय कारण? मी कुठेही लपून गेलो नाही असेही अजित पवार म्हणाले. मी कधी लपून गेलो सांगा ना? असा सवाल अजित पवारांनी केला. चोरडिया यांचे आणि आमचे दोन पिढ्यांचे नाते आहे. चोरडिया हे पवारसाहेबांचे क्लासमेट आहेत. चोरडिया यांनी पवार साहेबांना जेवायला बोलावले होते. त्यावेळी जयंत पाटील देखील त्याठिकाणी पवारसाहेब यांच्यासोबत होते असे अजित पवार म्हणाले. दोन पिढ्या ओळखीच्या असणाऱ्या व्यक्तींच्या घरी जाणे काय चुकीचे? असेही अजित पवार यावेळी म्हणाले. मी नात्यानं शरद पवार यांचा पुतण्या लागतो. त्यामुळं कारण नसताना याला काहीजण वेगळ्या प्रकारची प्रसिद्धी देत आहेत. त्यातून समज गैरसमज निर्माण होत आहेत.























