Jalna Road Incident : जालना -हिंगोलीतील डांबरी रस्ता उखडला, प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून डांबरीकरण
abp majha web team
Updated at:
30 May 2023 03:39 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजालन्याच्या अंबड तालुक्यातील कर्जत-हस्तपोखरी रस्त्याचं डांबरीकरण सुरु आहे.. मात्र डांबरीकरणानंतर अवघ्या काही तासातच रस्ता उखडलाय.. अगदी एखाद्या कार्पेटप्रमाणे हा रस्ता नागरिकांनी गुुंडाळल्याचं दिसून आलंय.. त्यामुळे कंत्राटदाराच्या कामावर नागरिकांनी संताप व्यक्त केलाय.. विशेष म्हणजे प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून या रस्त्याचं काम करण्यात आलंय.. खास जर्मन तंत्रज्ञाने हा रस्ता केल्याचा दावा कंत्राटदाराने केलाय.. मात्र नागरिकांनी अगदी आरामात हा रस्ता हातांनी उचलून बाजुला केलाय