Vegetable Dehydration Jalgaon: कांदा आणि भाज्यांचं निर्जलीकरण करुन मिळवला नफा, महिलांचा अनोखा उपक्रम
Vegetable Dehydration Jalgaon: कांदा आणि भाज्यांचं निर्जलीकरण करुन मिळवला नफा, महिलांचा अनोखा उपक्रम
संकटावर मात करुन ठामपणे उभं राहाणाऱ्या शेतकऱ्याची एकीकडे हरभरा आणि कांद्यामुळे राज्यातल्या बळीराजासमोर संकटाचा डोंगर उभा ठाकलाय. अशातच कांद्याला भावच मिळत नसल्यानं उभ्या पिकावर आता नांगर फिरवण्याची वेळ आलीय. याच संकटातून वाट काढत जळगावमधल्या एका महिलेनं कांदा आणि भाज्यांपासून नफा मिळवण्यास सुरुवात केलीय. या महिलेने भाज्या निर्जलीकरण प्रकल्प उभा केलाय. या प्रकल्पाच्या माध्यमातून या भाज्यांची पावडर तयार करून त्याचं मूल्यवर्धन करण्याचा हा प्रकल्प आहे... शिवाय परिसरातील दहा महिलांना रोजगारही दिलाय.


















