एक्स्प्लोर
Kishor Patil : पत्रकाराला मारहाण करणारे माझे कार्यकर्ते नाहीत- किशोर पाटील
Kishor Patil : पत्रकाराला मारहाण करणारे माझे कार्यकर्ते नाहीत- किशोर पाटील जळगावच्या पाचोऱ्यामध्ये पत्रकार संदीप महाजन यांना काही दिवसांपूर्वी मारहाण करण्यात आली होती. या मारहाणीचा आरोप त्यांनी थेट आमदार किशोर पाटील यांच्यावर केलाय. त्यानंतर हे प्रकरण आणखीनच चिघळलंय. मात्र या प्रकरणावर आता आमदार किशोेर पाटील यांनी त्यांची भूमिका मांडलीये. या प्रकरणाची आपला आणि कार्यकर्त्यांचा काहीही संबंध नसल्याचा दावा आमदार किशोर पाटील यांनी केलाय. यानंतर पत्रकार संदीप महाजन यांनी मारहाण प्रकरणातील आरोपींचे आमदार किशोर पाटील यांच्यासोबतचे फोटो सादर केलेत. त्यामुळे हे प्रकरण दिवसेंदिवस चिघळत आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
नाशिक
नागपूर


















