Indian Army Full PC : 400 ड्रोनद्वारे केलेले हल्ले परतवून लावले,भारताने पुराव्यासह उघडं पाडलं
Indian Army Full PC : 400 ड्रोनद्वारे केलेले हल्ले परतवून लावले,भारताने पुराव्यासह उघडं पाडलं
भारताने पाकिस्तानच्या हवाई हद्दीचे उल्लंघन करुन भारतीय हद्दीत प्रवेश केला आणि 400 ड्रोनचा वापर करुन 36 ठिकाणी हल्ला केला. पाकिस्तानने या हल्ल्यासाठी तुर्कीच्या ड्रोनचा वापर केला. पाकच्या या हल्ल्याला भारताने सडेतोड उत्तर दिलं अशी माहिती परराष्ट्र खात्याच्या पत्रकार परिषदेत देण्यात आली. कर्नल सोफिया कुरेशी, विंग कमांडर व्योमिका सिंह आणि परराष्ट्र खात्याचे सचिव विक्रम मिस्त्री यांनी ही पत्रकार परिषद घेऊन पाकिस्तानचा रडीचा डाव उघडा पाडला. पाकिस्तानकडून धार्मिक ठिकाणे लक्ष्य पाकिस्तानने एका ख्रिश्चन शाळेला आणि गुरुद्वाराला लक्ष्य केलं. ख्रिश्चन शाळेवर केलेले्या हल्ल्यामध्ये दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली. तुर्कीच्या ड्रोनच्या माध्यमातून भारतावर हल्ला पाकिस्तानने सीमारेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन केलं आणि 400 ड्रोनच्या सहाय्याने 36 ठिकाणी हल्ले केले. त्यापैकी बहुतांश ड्रोन भारतीय सेनेने पाडलं. इतक्या मोठ्या ड्रोन हल्ल्याचा अर्थ असा होता की त्यांना भारताच्या हवाई संरक्षण यंत्रणेची ताकद जाणून घ्यायची होती. हे ड्रोन तुर्कीचे होते. भारताने बहुतेक ड्रोन नष्ट केले.






















