देशद्रोह कायदा ब्रिटिशांनी गांधी, टिळकांसारख्या नेत्यांविरूद्ध वापरला, तो रद्द का केला जात नाही?
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSedition Law: सुप्रीम कोर्टाने आज (गुरुवारी) देशद्रोह कायद्याचा गैरवापर होत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली. स्वातंत्र्यलढ्यात महात्मा गांधींसारख्या लोकांना गप्प करण्यासाठी वापरण्यात येणारा कायदा रद्द का केला जात नाही? असा प्रश्न कोर्टाने केंद्र सरकारला विचारला आहे. सुप्रीम कोर्टाच्या टीकेनंतर राहुल गांधींनी ट्विट केले की आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या या टिप्पणीचे स्वागत करतो.
सरन्यायाधीश एन.व्ही. रमण, न्यायमूर्ती ए. एस. बोपन्ना आणि न्यायमूर्ती हृषिकेश रॉय यांच्या खंडपीठाने आज भारतीय दंड संहितेच्या कलम 124 ए (देशद्रोह) च्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणार्या माजी मेजर जनरल आणि एडिटरस गिल्ड ऑफ इंडियाच्या याचिकांवर विचार करण्यास सहमती दर्शावत त्याची मुख्य चिंता म्हणजे "कायद्याचा गैरवापर" होय. असल्याचे सांगितले.