Western Protest at haridwar Ghat : बृजभूषण सिंह यांना अटक का करत नाही? पैलवानांचा सवाल
बुलेटिनची सुरुवात करुया दिल्लीतून, आंदोलनाला बसलेल्या पैलवानांच्या बातमीने. दिल्लीत जंतरमंतरवर धरणे आंदोलनाला बसलेले आंदोलक पैलवान त्यांची पदकं हरिद्वारला गंगेत विसर्जित करणार आहेत. आम्ही न्याय मागतोय, पण आमचं आंदोलन संपवण्याचा प्रयत्न होतोय.. त्यामुळे या मेडल्सना काहीही किंमत उरलेली नाही, अशी तीव्र भावना या पैलवानांनी व्यक्त केलीय. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप असून त्यांना अटक करावी, अशी या पैलवानांची मागणी आहे. परंतु, गुन्हा दाखल केल्यानंतरही सरकार बृजभूषण सिंह यांना अटक करत नसल्याने महिला आणि पुरुष पैलवान आक्रमक झालेत. आणि म्हणूनच हरिद्वारच्या गंगेत पदकं विसर्जित करण्याचा निर्धार त्यांनी केलाय. त्यानंतर इंडिया गेटवर उपोषणाला बसू, अशी भूमिका या पैलवानांनी स्पष्ट केलीय.























