Congress President : काँग्रेस अध्यक्षपदासाठी घडामोडींना वेग, कोण होणार अध्यक्ष?
काँग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज करण्याचा आज अखेरचा दिवस आहे आणि या स्पर्धेत नव्या नावांची चर्चा सुरु झालीय. अध्यक्षपदाच्या शर्यतीत सर्वात पुढे असलेल्या अशोक गहलोत यांनी माघार घेतल्यानंतर आता दिग्विजय सिंह, मल्लिकार्जुन खर्गे यांची नावं चर्चेत आहेत. शशी थरूर आधीपासूनच अध्यक्षपदाच्या शर्यतीत आहेत. अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत घडामोडींना वेग आलाय... दिग्विजय सिंह हे मल्लिकार्जुन खर्गे यांच्या भेटीसाठी पोहोचलेत. यावेळी अध्यक्षपदाच्या उमेदवारीबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.. दरम्यान, अशोक गहलोत, सचिन पायलट, काँग्रेस सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल आणि मल्लिकार्जुन खर्गे यांनी काल दिवसभरात सोनिया गांधी यांची भेट घेतली. आज अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी काय घडामोडी घडतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे.
























