Nirbhaya Rape Case : दोषी मुकेशची फाशी निश्चित; सर्वोच्च न्यायालयानं याचिका फेटाळली | ABP Majha
निर्भया बलात्कार प्रकरणातला दोषी मुकेश कुमारची फाशी निश्चित झाली आहे. दोषी मुकेशची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली आहे. राष्ट्रपतींनी दया अर्ज फेटाळल्यानंतर मुकेशनं सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. मात्र, कोर्टानं याचिका फेटाळली आहे. त्यामुळं मुकेशच्या फाशीचा मार्ग आता मोकळा झालाय. एक फेब्रुवारीला सकाळी सात वाजता मुकेशला तिहार कारागृहात फाशी होण्याची दाट शक्यता आहेत.