Special Report Ram Mandir : कसं आहे अयोध्येतील रामलल्लाचं महन्मंगल मंदिर ? ABP Majha
abp majha web team
Updated at:
21 Dec 2023 11:23 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSpecial Report Ram Mandir : कसं आहे अयोध्येतील रामलल्लाचं महन्मंगल मंदिर ? ABP Majha
अयोध्या... संथ... शीतल आणि सात्विक वेगानं वाहणाऱ्या शरयू नदीकिनारी वसलेली आटपाट नगरी. याच भूमीत प्रभू श्रीरामानं जन्म घेतला. आणि पुढे त्याच श्रीरामानं जगाला, मर्यादा, संयम आणि शौर्य अशा त्रिसूत्रीचा महामंत्र दिला. अयोध्येच्या त्याच पावन भूमीत प्रभू श्रीरामाचं भव्य मंदिर उभारलं जातंय. लवकरच रामभक्तांसाठी हे मंदिर खुलं होणार आहे. त्यामुळं सर्वसामान्यांना प्रभू श्रीरामाचं याचि देही, याचि डोळा दर्शन घेता येणार आहे. पाहूयात कसं आहे रामलल्लाचं महन्मंगल मंदिर...