Special Report | 20 वर्षापासून दाऊदचा 'जान' मोहम्मद अटकेत, मुंबईच्या हृदयात राहणारा समीर कालीया
जान मोहम्मद अली शेख सायन पश्चिमेकडील एमजी रोडवर असणाऱ्या कालाबखर परिसरात वास्तव्यास होता. सायन येथील तो फार जुना रहिवाशी आहे. त्याच्यासोबत त्याची पत्नी आणि दोन मुली असे चौघेजण या घरात राहत होते. मुंबईच्या धारावीमध्ये जान मोहम्मदच्या घराच्या आजूबाजूला राहणाऱ्या लोकांचं म्हणणं आहे की, जान मोहम्मदनं तीन दिवसांपूर्वी आमच्यासोबत चहा घेतला. तो स्वभावानं चांगला होता. ड्रायव्हर म्हणून काम करत होता. जान मोहम्मद धारावी परिसरात बऱ्याच वर्षांपासून राहत होता. जान महोम्मद दहशदवादी कटात सहभागी होता, या बातमीनं त्याच्या घराच्या आजूबाजूला राहणाऱ्या सर्वांनाच धक्का बसला आहे. तसेच त्याचा स्वभाव अत्यंत साधा होता म्हणून, तो दहशतवादी कटात सहभागी असेल, असा संशयही कधी आला नाही.






















