PM Modi on Rahul Gandhi : राहुल गांधी वायनाडमधून बाहेर पडणार
पंतप्रधान नरेंद्र मोदीं आज नांदेडसह परभणीत सभा झाली.. यावेळी बोलतांना मोदींनी राहुल गांधींवर जोरदार निशाणा साधलाय. अमेठीनंतर वायनाडमधूनही राहुल गांधी बाहेर पडणार असल्याची टीका मोदींनी केलीय. यावेळी बोलताना त्यांनी इंडिया आघाडीसह राज्यातील महाविकास आघाडीवर निशाणा साधलाय.मविआच्या काळात मराठवाड्याचा विकास झाला नसून मराठवाड्यातील महत्त्वाच्या योजना आघाडी सरकारनं बंद केल्याचा आरोप पंतप्रधान मोदींनी केलाय.. तर देशाला आत्मनिर्भर बनवण्यासाठी परभणीचीही मदत होणार असून ज्वारी बाजरीचं महत्त्वंच संपूर्ण जगाला कळणार असल्याचं पंतप्रधान मोदींनी सांगितलं.. तर परभणीत बोलतांना पंतप्रधान मोदींनी जानकरांचा उल्लेख लहान भाऊ म्हणून केलाय.






















