एक्स्प्लोर

Remdesivir Prices | दिलासादायक बातमी! रेमडेसिवीरच्या किंमती घटल्या

नवी दिल्ली : राष्ट्रीय औषध निर्धारण प्राधिकरणाने शनिवारी सांगितलं की सरकारच्या हस्तक्षेपानंतर औषधं निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी रेमडेसिवीरच्या किंमतीत घट केली आहे. कोरोनाच्या उपचारामध्ये रेमडेसिवीर इंजेक्शन महत्वाची भूमिका बजावते. सरकारने रेमडेसिवीर निर्मिती करणाऱ्या कंपन्यांची एक बैठक घेतली. त्यामध्ये कॅडिला हेल्थकेयर, डॉ. रेड्डीज लॅबोरेटरी आणि सिप्ला या आघाडीच्या कंपन्यांनी रेमडेसिवीर इंजेक्शनच्या (100 मिग्रॅ) किंमतीमध्ये घट करण्याचा निर्णय घेतलाय. 

कंपन्यांच्या या निर्णयामुळे आता कॅडिला कंपनीच्या रेमडेसिवीरच्या किंमती आता 2800 रुपयांवरुन 899 रुपये इतकी होणार आहे. तसेच सिंजीन इंटरनॅशनलच्या रेमविन नावाने तयार होत असलेल्या रेमडेसिवीरची किंमत आता 3950 वरुन आता 2450 रुपये झाली आहे. डॉ. रेड्डीज लॅबोरेटरी च्या रेमडेसिवीरची किंमत आता 5400 वरुन आता 2700 रुपये इतकी होणार आहे तर सिप्लाच्या रेमडेसिवीरची किंमत 4000 वरुन 3000 रुपये इतकी होणार आहे. 

माइलान कंपनीने आपल्या रेमडेसिवीरची किंमत कमी करुन ती 3400 रुपये इतकी केली आहे. या आधी ती 4800 रुपये होती. 

कोरोनाच्या उपचारामध्ये अॅन्टी व्हायरल म्हणून उपयोगी पडणाऱ्या रेमडेसिवीरचे उत्पादन आता दुप्पट करण्याची परवानगी केंद्र सरकारने औषधं कंपन्यांना दिली आहे. त्यामुळे सध्या प्रत्येक महिन्यात होणारे 38.8 लाख रेमडेसिवीरचे उत्पादन आता 78 लाख होणार आहे. तसेच रेमडेसिवीरच्या किंमतीमध्येही घट करण्याची तयारी खासगी औषधं कंपन्यांनी दर्शवली आहे. त्यामुळे कोरोना विरोधातल्या लढाईला मोठा हातभार लागणार आहे अशी आशा व्यक्त केली जात आहे.

कोरोनाच्या वाढत्या संक्रमणानंतर  रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठा तुटवडा देशात जाणवत होता. रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी रुग्णांच्या नातेवाईकांना मोठी धावपळ करावी लागत आहे. अनेक राज्यांकडून रेमडेसिवीरच्या इंजेक्शनचा तुटवडा असल्याची तक्रार येत होती

महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांत रेमडेसिवीरचा मोठा तुटवडा जाणवत होता. तसेच देशातल्या इतर भागातही हीच परिस्थिती होती. त्यामुळे भारत सरकारने रेमडेसिवीर इंजेक्शनची निर्यात थांबवली आहे. देशातील कोरोना स्थिती सुधारेपर्यंत हे आदेश लागू असणार आहेत.

भारत व्हिडीओ

Vijay Wadettiwar : आम्ही निवडणुकीची वाट बघतोय; तिजोरी साफ करण्याचं काम सरकारने केलं
Vijay Wadettiwar : आम्ही निवडणुकीची वाट बघतोय; तिजोरी साफ करण्याचं काम सरकारने केलं

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑक्टोबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑक्टोबर 2024 | मंगळवार
Vijay Wadettiwar : नरेंद्र मोदींच्या खुर्चीला बसणार धक्का, महाराष्ट्राची निवडणूक जाहीर होताच विजय वडेट्टीवारांचा मोठा दावा
नरेंद्र मोदींच्या खुर्चीला बसणार धक्का, महाराष्ट्राची निवडणूक जाहीर होताच विजय वडेट्टीवारांचा मोठा दावा
विधानसभेचा अर्ज भरण्यासाठी 15 दिवसच उरले, अद्याप उमेदवारांचा पत्ता नाही; मनसे अन् वंचितने घेतली आघाडी
विधानसभेचा अर्ज भरण्यासाठी 15 दिवसच उरले, अद्याप उमेदवारांचा पत्ता नाही; मनसे अन् वंचितने घेतली आघाडी
Maharashtra Vidhan Sabha Elections 2024: केंद्रीय निवडणूक आयोगाचा मुंबईतील मतदारांसाठी महत्त्वाचा निर्णय, ती चूक टाळणार, BMC आयुक्तांना कठोर निर्देश
केंद्रीय निवडणूक आयोगाचा मुंबईतील मतदारांसाठी महत्त्वाचा निर्णय, ती चूक टाळणार, BMC आयुक्तांना कठोर निर्देश
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Shirsat On Assembly Election : लोकसभेला त्यांचा गंगूबाईचा डान्स सुरु होता, तेव्हा मग आता..Ambadas Danve On Assembly Election : भाजपला विचारुनच निवडणूक आयोग सगळं ठरवतं- दानवेSanjay Raut On Assembly Election : निवडणुका जाहीर, आम्ही निवडणुकीसाठी सज्ज- संजय राऊतMaharashtra VidhanSabha Elections 2024:  निवडणूक आयोगाचा मुंबईतील मतदारांसाठी महत्त्वाचा निर्णय

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑक्टोबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑक्टोबर 2024 | मंगळवार
Vijay Wadettiwar : नरेंद्र मोदींच्या खुर्चीला बसणार धक्का, महाराष्ट्राची निवडणूक जाहीर होताच विजय वडेट्टीवारांचा मोठा दावा
नरेंद्र मोदींच्या खुर्चीला बसणार धक्का, महाराष्ट्राची निवडणूक जाहीर होताच विजय वडेट्टीवारांचा मोठा दावा
विधानसभेचा अर्ज भरण्यासाठी 15 दिवसच उरले, अद्याप उमेदवारांचा पत्ता नाही; मनसे अन् वंचितने घेतली आघाडी
विधानसभेचा अर्ज भरण्यासाठी 15 दिवसच उरले, अद्याप उमेदवारांचा पत्ता नाही; मनसे अन् वंचितने घेतली आघाडी
Maharashtra Vidhan Sabha Elections 2024: केंद्रीय निवडणूक आयोगाचा मुंबईतील मतदारांसाठी महत्त्वाचा निर्णय, ती चूक टाळणार, BMC आयुक्तांना कठोर निर्देश
केंद्रीय निवडणूक आयोगाचा मुंबईतील मतदारांसाठी महत्त्वाचा निर्णय, ती चूक टाळणार, BMC आयुक्तांना कठोर निर्देश
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा संपूर्ण कार्यक्रम, अर्जाची तारीख, मतदान अन् निकाल; A टू Z अपडेट
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा संपूर्ण कार्यक्रम, अर्जाची तारीख, मतदान अन् निकाल; A टू Z अपडेट
Maharashtra Vidhan Sabha Elections 2024: 20 नोव्हेंबरला मतदान, 23 नोव्हेंबरला निकाल; महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, वाचा टॉप 10 मुद्दे
20 नोव्हेंबरला मतदान, 23 नोव्हेंबरला निकाल; महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, वाचा टॉप 10 मुद्दे
Maharashtra Vidhan Sabha Elections 2024 : निवडणुकीतील गैरप्रकार रोखण्यासाठी निवडणूक आयोगाचं परफेक्ट नियोजन, मतदारांना महत्त्वाचं आवाहन
सर्व प्रक्रियेची व्हिडीओग्राफी ते चुकीच्या गोष्टी रोखण्यासाठी मतदारांची मदत, निवडणूक आयोगाचं परफेक्ट नियोजन
Maharashtra Assembly Elections 2024 : उत्तर महाराष्ट्रातील 47 विधानसभा मतदारसंघात मतदान कधी? निकाल कधी? जाणून घ्या एका क्लिकवर
उत्तर महाराष्ट्रातील 47 विधानसभा मतदारसंघात मतदान कधी? निकाल कधी? जाणून घ्या एका क्लिकवर
Embed widget