एक्स्प्लोर

Corona Vaccine : देशात लसीचा तुटवडा दूर करण्यासाठी नितीन गडकरी यांचा 'फॉर्म्युला'

नवी दिल्ली : देशात कोरोनाचा विळखा अधिक घट्ट होत चालला आहे. देशातील रुग्णवाढीचा वेग मंदावला असला तरी मृताचा आकडा मात्र सातत्यानं वाढत आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा दिवसेंदिवस उच्चांक गाठत आहे. अशातच कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सध्या लसीकरण हाच प्रभावी उपाय असल्याचं सांगितलं जात आहे. लसीकरण हा एकच मार्ग सध्या संपूर्ण जगासमोर असल्याचंही अनेक तज्ज्ञांनी सांगितलं आहे. भारतातही लसीकरण मोहीम सुरु आहे. मात्र लसींच्या तुटवड्यामुळे लसीकरण मोहीमेत अनेक अडथळे येत आहेत. लसींच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे आणि देशाची गरज लक्षात न घेता परदेशात लस धाडल्यामुळे मोदी सरकारला सातत्याने टीकाही सहन करावी लागली आहे. अशातच मंगळवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देशात लसीचा तुटवडा दूर करुन लसीचं उत्पादन वाढवण्यासाठी एक नवा मार्ग सुचवला आहे. देशातील इतर लस बनवणाऱ्या कंपन्यांनाही करोनावरील प्रभावी लस बनवण्याचा परवाना दिला जावा, असं नितीन गडकरी यांनी सुचवलं आहे. 

नितीन गडकरी बोलताना म्हणाले की, "जर लसीची मागणी ही पुरवठ्यापेक्षा जास्त असल्याने समस्या निर्माण होत असेल, तर केवळ एकाच कंपनीला देण्याऐवजी आणखी 10 कंपन्यांना लस तयार करण्यासाठी परवाना द्या. त्यांना देशात आवश्यकतेनुसार पुरवठा करु द्या आणि नंतर जास्त निर्मिती झाल्यास त्यांना निर्यात करण्यासाठी परवानगी द्या. प्रत्येक राज्यात दोन - तीन लॅब आहे. त्यांनी लसनिर्मिती सेवा म्हणून नाही तर 10 टक्के रॉयल्टीसोबत करावी. हे केवळ 15 ते 20 दिवसात करता येईल." तसेच पुढे बोलताना औषधाचं पेटेन्ट असलेल्यांना आणखीन काही औषध कंपन्यांद्वारे 10 टक्के रॉयल्टी देण्याची व्यवस्था करण्यात यावी, असंही त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केलं आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी बोलताना कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या अंत्यसंस्काराबाबतही काही गोष्टी सुचवल्या. ते म्हणाले की, "कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या अंत्यंस्कारासाठीही सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे. शानभूमीत डिझेल, इथेनॉल, बायोगॅस आणि वीज यांचा वापर तर अंत्यसंस्कारासाठी खर्च कमी येईल." बिहार आणि उत्तर प्रदेशात अंत्यसंस्कारासाठी अधिक पैसे द्यावे लागत असल्याने मृतदेह गंगेत सोडण्यात येत असल्याचं समोर आलं आहे. यावरुन संपूर्ण देशभरातून अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. त्यानंतर आलेल्या अनेक तक्रारीनंतर नितीन गडकरी यांनी हा प्रस्ताव केंद्राकडे मांडला आहे. 

भारत व्हिडीओ

Bharat Gogawale On Deepak Kesarkar : केसरकरांकडून काही चुकीचं घडलं असेल तर एकनाथ शिंदे धोरण ठरवतील
Bharat Gogawale On Deepak Kesarkar : केसरकरांकडून काही चुकीचं घडलं असेल तर एकनाथ शिंदे धोरण ठरवतील

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

गोरेगावमधील गोकुळधाम परिसरातील इमारतीला भीषण आग, होरपळून एका महिलेचा मृत्यू 
गोरेगावमधील गोकुळधाम परिसरातील इमारतीला भीषण आग, होरपळून एका महिलेचा मृत्यू 
Harshvardhan Sadgir : जेव्हा शासकीय नोकरीची गरज होती पण मिळाली नाही,आज हिमतीनं डबल महाराष्ट्र केसरी बनलो, मॅटवरील कुस्तीतून निवृत्ती घेतोय : हर्षवर्धन सदगीर
मला संपल्यात जमा केलेलं, डबल महाराष्ट्र केसरी झालो, आनंदानं मॅटवरील कुस्तीतून निवृत्ती घेतोय : हर्षवर्धन सदगीर
Datta Meghe Passes Away : माजी मंत्री दत्ता मेघे यांचं निधन, वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Datta Meghe Passes Away : माजी मंत्री दत्ता मेघे यांचं निधन, वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Nanded : नांदेडच्या प्रफुल्ल पाटील या तरुणानं नातं जपलं, भावाच्या निधनानंतर वहिनीसोबत विवाह, पोरका झालेला संसार सावरला
प्रफुल्ल पाटील या तरुणानं नातं जपलं, भावाच्या निधनानंतर वहिनीसोबत विवाह, पोरका झालेला संसार सावरला
ABP Premium

व्हिडीओ

Ramdas Athwale on Ashok Kharat : नाशिकमधील खरात भोंदूबाबाला फाशीची शिक्षा द्या
Vinayak Raut On Deepak Kesarkar : खरातप्रकरणी विनायक राऊतांचे खळबळजनक दावे
Jaykumar Gore Satara : पालकमंत्र्यांचे आकांडतांडव आणि पोलिसांची हरेसमेंट थांबवा, देसाईंवर प्रहार
Rupali Thombare On Rupali Chakankar : भोंदूबाबा राज्य महिला आयोग चालवत होता- रुपाली ठोंबरे
Ashok Kharat Case : खरातविरोधात आणखी तीन पीडित महिलांची तक्रार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Indians : हार्दिक पांड्या नव्हे सूर्यकुमार यादवला मुंबईचा कर्णधार करा, भारताच्या माजी कॅप्टनचा सल्ला
हार्दिक पांड्या नव्हे सूर्यकुमार यादवला मुंबईचा कर्णधार करा, भारताच्या माजी कॅप्टनचा सल्ला
प्रत्येक धर्मात अशोक खरातसारखे काही सडके आंबे निघतातच, नितेश राणेंचा हल्लाबोल, पीडित महिलांना सरकारशी संपर्क करण्याचं आवाहन
प्रत्येक धर्मात अशोक खरातसारखे काही सडके आंबे निघतातच, नितेश राणेंचा हल्लाबोल
Datta Meghe Passes Away : माजी मंत्री दत्ता मेघे यांचं निधन, वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Datta Meghe Passes Away : माजी मंत्री दत्ता मेघे यांचं निधन, वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
संतापजनक! 50 वर्षाच्या नराधमाने अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार, परळीत पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल
संतापजनक! 50 वर्षाच्या नराधमाने अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार, परळीत पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल
Nanded : नांदेडच्या प्रफुल्ल पाटील या तरुणानं नातं जपलं, भावाच्या निधनानंतर वहिनीसोबत विवाह, पोरका झालेला संसार सावरला
प्रफुल्ल पाटील या तरुणानं नातं जपलं, भावाच्या निधनानंतर वहिनीसोबत विवाह, पोरका झालेला संसार सावरला
Maharashtra Kesari नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 68 वा 'महाराष्ट्र केसरी'; फॉर्च्यूनर जिंकणारा पहिला पैलवान, चांदीची गदा अन् बक्षिसांचा वर्षाव
नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 68 वा 'महाराष्ट्र केसरी'; फॉर्च्यूनर जिंकणारा पहिला पैलवान, चांदीची गदा अन् बक्षिसांचा वर्षाव
पर्यटकांला अतिउत्साह नडला, फॉर्च्यूनर थेट समुद्रात अडकली; जेसीबी बोलवून बाहेर काढली, समुद्रकिनारी पाहायला गर्दी
पर्यटकांला अतिउत्साह नडला, फॉर्च्यूनर थेट समुद्रात अडकली; जेसीबी बोलवून बाहेर काढली, समुद्रकिनारी पाहायला गर्दी
ईदनिमित्ताने नातेवाईकांकडे जाताना कारला भीषण अपघात; परभणीत एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू
ईदनिमित्ताने नातेवाईकांकडे जाताना कारला भीषण अपघात; परभणीत एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू
Embed widget