(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nitin Gadkari on seat Belt : कारमध्ये पाठीमागे बसणाऱ्यांनी सीट बेल्ट लावला नाही, तर सायरन वाजणार
कारमध्ये पाठीमागे बसणाऱ्यांनी सीट बेल्ट लावला नाही, तर सायरन वाजणार असल्याचंही नितीन गडकरींनी यावेळी बोलताना सांगितलं. यासंदर्भात बोलताना नितीन गडकरी बोलताना म्हणाले की, "कारमधून प्रवास करताना आता मागच्या प्रवाशांनाही सीट बेल्ट लावावा लागणार आहे. कारण मागच्या प्रवाशांनी सीट बेल्ट लावला नाही तर सायरन वाजणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी एबीपी माझाला दिलेल्या विशेष मुलाखतीत ही माहिती दिली आहे. सील बेल्टसाठी कारमध्ये आता नवी पद्धत लागू करण्यात येणार आहे.
एबीपी माझाला दिलेल्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत नितीन गडकरी यांनी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. तसेच, सध्या राजकीय वर्तुळात सुरु असणाऱ्या अनेक महत्त्वाच्या विषयांवर भाष्य केलं. गडकरींनी कार कंपन्यांना देखील प्रश्न विचारले आहेत. ते म्हणाले की, इकॉनॉमिक मॉडेल निर्यात करायचं असेल तर त्याला 6 एअर बॅग्स देता, पण भारतात इकॉनॉमिक मॉडेल देताना मात्र केवळ दोनच एअर बॅग दिल्या जातात, असं का? यासंदर्भातही चर्चा सुरू असल्याचं नितीन गडकरींनी सांगितलं. तसेच यासंदर्भातही लवकरत निर्णय घेतला जाईल, असंही सांगितलं. काही दिवसांपूर्वी बोलताना नितीन गडकरींनी हवेत उडणाऱ्या बससंदर्भात घोषणा केली होती. त्याबाबत विचारलं असता, बंगळुरूतील एका कंपनीशी बोलणं सुरु असल्याचं त्यांनी सांगितलं.