Nirbhaya Case | दोषी अक्षय ठाकूरच्या फेरविचार याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी | ABP Majha
निर्भया हत्याकांडातील दोषी अक्षय ठाकूरच्या पुनर्विचार याचिकेवर सर्वोच्च न्यायालय दुपारी एक वाजता फैसला सुनावणार आहे. अक्षयच्या बाजूनं वकील एपी सिंह यांनी कोर्टाला अक्षय ठाकूरला फाशीची शिक्षा देऊ नका, अशी विनंती केली आहे. सुप्रीम कोर्टाने निर्भया हत्याकांडातील चार दोषींना फाशींची शिक्षा सुनावली आहे. तर, अक्षय ठाकूरचे वकील एपी सिंह यांनी तुरुंगात आत्महत्या केलेल्या राम सिंहच्या मृत्यूवरही आक्षेप नोंदवला आहे. रामसिंहच्या अहवालात दारु असल्याचं समोर आलं, मग त्याची चौकशी का झाली नाही? शिवाय तुरुंगातील कैद्याला दारु कुठून मिळाली? असा सवालही एपी सिंह यांनी कोर्टासमोर उपस्थित केलाय. दरम्यान, 16 डिसेंबर 2012 रोजी दिल्लीत निर्भयाचा सामूहिक बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली होती. त्यात एकूण 6 आरोपी होते. त्यातील एक अल्पवयीन होता, तर एका आरोपीने तुरुंगात असतानाच आत्महत्या केली.