एक्स्प्लोर
Mohammed Shami Arjuna Award : अर्जुन पुरस्कारासाठी शमीची शिफारस, वन डे विश्वचषकात चमकदार कामगिरी
Mohammed Shami Arjuna Award : अर्जुन पुरस्कारासाठी शमीची शिफारस, वन डे विश्वचषकात चमकदार कामगिरी
भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आलीय. बीसीसीआयने मोहम्मद शमीचं नाव अर्जुन पुरस्कारासाठी पाठवलंय. वन डे विश्वचषकातील चमकदार कामगिरीनंतर शमीची शिफारस करण्यात आलीय. शमीने या स्पर्धेत सात सामन्यांत सर्वाधिक २४ विकेट्स घेतल्यात. शमीशिवाय अन्य १६ खेळाडूंना अर्जुन पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी पुरुष दुहेरी बॅडमिंटन जोडी सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टीची निवड करण्यात आलीय.
आणखी पाहा























