Madhya Pradesh Accident :मध्य प्रदेशातील गुनामध्ये बस आणि डंपरची जोरदार धडक,अपघातात 12 जणांचा मृत्यू
abp majha web team
Updated at:
28 Dec 2023 07:43 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMadhya Pradesh Accident :मध्य प्रदेशातील गुनामध्ये बस आणि डंपरची जोरदार धडक,अपघातात 12 जणांचा मृत्यू
मध्य प्रदेशातील गुनामध्ये बुधवारी रात्री बस आणि डंपरचा भीषण अपघात झालाय. या अपघातात १२ जणांचा मृत्यू झाला असून, १४ जण गंभीर जखमी झालेत. त्यांच्यावर गुना जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. बस आणि डंपरच्या जोरदार धडकेनंतर बसला आग लागली. घटनास्थळी रेस्क्यू ऑपरेशन चालू आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी शोक व्यक्त केला असून, मृतांच्या कुटुंबीयांना चार लाख रुपयांची तर जखमींना पन्नास हजार रुपयांच्या मदतीची घोषणा मुख्यमंत्री मोहन यादव यांनी केलीय.