Bhaskar Jadhav On Nana Patole : पटोलेंपेक्षा त्यांचे पक्षश्रेष्ठी काय बोलतात याला जास्त महत्त्व
Bhaskar Jadhav On Nana Patole : "पटोलेंपेक्षा त्यांचे पक्षश्रेष्ठी काय बोलतात याला जास्त महत्त्व"
नाना पटोले काय बोलतात, यापेक्षा त्यांचे पक्षश्रेष्ठी काय बोलतात याला जास्त महत्व आहे.. काल मविआ च्या बैठकीत वरिष्ठ नेत्यांनी आम्ही आघाडी म्हणून लढू असे जाहीर केले आहे.. त्यास महत्त्व आहे...
महाराष्ट्रामध्ये २८८ जागेवर काँग्रेसची विधानसभेची तयारी सुरू झालेली आहे, असं सूचक विधान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं होतं त्यांच्या या विधानावर आज ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधवांनी काय प्रतिक्रिया दिलीये पाहूयात
लोकसभा निवडणुकीत विदर्भातील शिवसेना कार्यकर्ता आणि पदाधिकारी यांनी उत्कृष्ट काम करून भाजप ला पराभूत केले, त्यामुळे त्यांचे आभार मानायला मी आलो आहे... लवकरच विधानसभेच्या निवडणुका होणार असून त्यासाठी लोकसभा आणि विधानसभा निहाय आज आढावा घेणार आहे.. विधानसभा निवडणुकांमध्ये पूर्व विदर्भात शिवसेना जास्तीत जास्त जागा लढू शकते का?? आणि जिंकू शकते का?? याचा आढावा मी घेणार आहे... या सह विविध विषयांवर त्यांनी भाष्य केलं ..