Chhatrapati Sambhaji Nagar : गुगल मॅपने केला गोंधळ, UPSC चे विद्यार्थी परीक्षेपासून वंचित
Chhatrapati Sambhaji Nagar : गुगल मॅपने केला गोंधळ, UPSC चे विद्यार्थी परीक्षेपासून वंचित
यूपीएससी परीक्षेत संभाजीनगरमध्ये गोंधळ, गुगल मॅपच्या चुकीमुळे यूपीएससीचे विद्यार्थी परीक्षेपासून वंचित, इतर जिल्ह्यातून आलेल्या विद्यार्थ्यांचे अश्रू अनावर.
देशभरात आज केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पार पडत आहेत. संभाजीनगरमध्ये देखील मराठवाड्यातून अनेक विद्यार्थी या परीक्षेसाठी दाखल झालेत, मात्र गुगल मॅपच्या चुकीमुळे यूपीएससीचे अनेक विद्यार्थ्य़ांना आपल्या केंद्रावर पोहोचण्यासाठी एक-दोन मिनिटांचा उशीर झाला, त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित राहावं लागलं.. शहरात जवळपास 50 विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित राहावं लागले. यावेळी अनेक विद्यार्थिनींना अश्रू अनावर झाले. देशभरात आज केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पार पडत आहेत. संभाजीनगरमध्ये देखील मराठवाड्यातून अनेक विद्यार्थी या परीक्षेसाठी दाखल झालेत, मात्र गुगल मॅपच्या चुकीमुळे त्यांना त्यांचे कॉलेज दुसऱ्याच ठिकाणी दाखवत असल्यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या केंद्रावर पोहोचण्यासाठी एक-दोन मिनिटांचा उशीर झाला, त्यामुळे त्यांना परीक्षेसाठी केंद्रात घेण्यात आले नाही. शहरात जवळपास 50 विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित रहावे लागले. यावेळी अनेक विद्यार्थिनींना अश्रू अनावर झाले.