Coronavirus | भारतामधील कोरोनाबाधितांचा आकडा 1 लाख 65 हजारांच्या पार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदेशात गेल्या 24 तासात कोरोनाबाधितांच्या संख्येत सर्वाधिक 7466 ची वाढ झाली आहे. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 1 लाख 65 हजार 799 वर पोहोचला आहे. त्यापैकी 71 हजार 105 रुग्ण बरे झाले आहेत. म्हणजे देशाचा रिकव्हरी रेट 42.88 टक्के आहे. सध्या कोरोनाची लागण असलेले रुग्ण 89 हजार 987 आहेत. गेल्या 24 तासात 3 हजार 313 रुग्ण बरे झाले असून 175 मृत्यूमुखी पडले. देशातील एकूण बळींची संख्या 4 हजार 706 एवढी आहे.