एक्स्प्लोर
Republic Day : भारताचा 73वा प्रजासत्ताक दिन आज देशभरात साजरा, PM मोदी हुतात्म्यांना वाहणार आदरांजली
भारताचा 73वा प्रजासत्ताक दिन आज देशभरात साजरा होत आहे. सकाळी सव्वा दहा वाजता राजपथावर प्रजासत्ताक दिन सोहळा सुरु होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी 10 वाजून 5 मिनिटांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकात जाऊन हुतात्म्यांना आदरांजली वाहणार आहेत. सकाळी सव्वा दहा वाजता पंतप्रधान मोदी यांचं राजपथावर आगमन होईल. तर 10 वाजून 23 मिनिटांनी राष्ट्रपती राजपथावर पोहोचतील. सकाळी 10 वाजून 26 मिनिटांनी राष्ट्रपतींच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. त्यानंतर सकाळी साडे दहा वाजल्यापासून राजपथावर संचलन सुरू होणार आहे.
आणखी पाहा























