एक्स्प्लोर
India Lock Down | आम्हाला शूट अॅट साईटचा आदेश द्यायला भाग पाडू नका : तेलंगणा सरकार
"आम्हाला संचारबंदी किंवा शूट अॅट साईटचा आदेश द्यायला भाग पाडू नका," असा सज्जड दम तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी भरला आहे. हैदराबादमधील पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं. नागरिकांनी लॉकडाऊन आदेशाचं उल्लंघन केल्यास शूट अॅट साईटचा आदेश द्यावा लागेल. त्यामुळे अशी परस्थिती उद्भवू देऊ नका," असं चंद्रशेखर राव म्हणाले. सोमवार आणि मंगळवारी लोक ज्याप्रकारे लॉकडाऊन तोडून घराबाहेर पडले त्यावर केसीआर यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















