Delhi Violence | दिल्ली हिंसाचारात 34 जणांचा मृत्यू, सोनिया गांधी आज राष्ट्रपतींना भेटणार
सलग 3 दिवस हिंसाचाराने होरपळल्यानंतर दिल्ली आता हळूहळू पूर्वपदावर येत आहे. हिंसाचारग्रस्त भागातल्या रस्त्यांवर पडलेले दगड, इतर वस्तू यांची साफसफाई सुरु आहे. दिल्लीची परिस्थिती आता नियंत्रणात येऊ लागली आहे. काल संध्याकाळी किंवा आज सकाळी हिंसा झाल्याची कोणतीही घटना अद्यापपर्यंत घडलेली नाही. सीएए आणि एनआरसी कायद्याचे समर्थक आणि विरोधक यांच्यात गेल्या रविवारी दगडफेक झाली. त्यानंतर 3 दिवस पूर्व दिल्ली पेटत राहिली. या हिंसाचारात 34 जणांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी 100 हून अधिक आरोपींना अटक केली आहे.