Pune Zika Virus : पुण्यात 46 वर्षीय डॉक्टर आणि त्यांच्या मुलीला झिका व्हायरसची लागण, प्रशासन सतर्क

Pune Zika Virus : पुण्यात 46 वर्षीय डॉक्टर आणि त्यांच्या मुलीला झिका व्हायरसची लागण, प्रशासन सतर्क

पुण्यात झीका आजाराचे दोन रुग्ण आढळले आहेत. कोथरूडच्या एरंडवणे भागातील एक ४६ वर्षीय डॉक्टर आणि त्याच्या १३ वर्षीय मुलीमधे झीकाची लक्षणे आढळली आहेत. ताप आणि अंगदुखी अशी ही लक्षणे आहेत. पुण्यात प्रथमच झीकाचे रुग्ण आढळले आहेत.

झिका व्हायरसची लक्षणं कोणती?

झिका विषाणू आजार हा एडिस इजिप्ती डासांमुळे होणारा सौम्य स्वरुपाचा आजार असून या आजारात 80 टक्के रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे आढळून येत नाहीत. इतर रुग्णांमध्ये ताप, सांधेदुखी, अंगदुखी, डोकेदुखी, डोळे लाल होणे, उलटी होणे, अस्वस्थता जाणवणे ताप, अंगावर पुरळ उठणे अशी लक्षणे आढळतात. झिका आणि इतर कीटकजन्य आजारांसाठी सर्वेक्षण सक्षम करत असतानाच कोरोना सर्वेक्षण आणि लसीकरण याकडे दुर्लक्ष होणार नाही, याबाबत दक्षता घेण्याबाबत सर्व संबंधितांना आरोग्य विभागाने निर्देश दिले आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola