Niranjan Davkhare on Election : विरोधकांकडून खोटे आरोप, मात्र माझं काम मतदारांना माहिती : डावखरे
Niranjan Davkhare on Election : विरोधकांकडून खोटे आरोप, मात्र माझं काम मतदारांना माहिती : डावखरे
कोकण पदवीधर मतदार संघासाठी भाजपकडून निरंजन डावखरे तिसऱ्यांदा उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत, त्यांना काँग्रेसच्या रमेश कीर यांचे आव्हान आहे, याच लोकसभा मतदारसंघासाठी मनसेने अभिजीत पानसे यांची उमेदवारी जाहीर करून नंतर माघार घेतली होती, त्यामुळे मनसेचा पाठिंबा देखील निरंजन डावखरे यांना मिळाला आहे, असे असताना या निवडणुकीत निरंजन डावखरे बाजी मारणार का आणि तिसऱ्यांदा कोकण पदवीधर मतदारसंघातून आमदार बनणार का याकडे सुशिक्षित पदवीधर यांचे लक्ष लागले आहे, निरंजन डावखरे यांनी थोड्या वेळापूर्वीच ठाण्यातील सरस्वती शाळेत जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला, यावेळी त्यांनी निवडून आल्यानंतर डिजिटलायझेशन साठी प्रयत्न करणार असून प्रत्येक शाळेत कॉलेज मध्ये सोलार सिस्टीम साठी प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले आहेत, तसेच रमेश कीर यांना स्वतःची कामगिरी सांगता येत नाही त्यामुळे माझ्यावर टीका करत असल्याचे प्रतिक्रिया डावखरे यांनी दिली आहे, त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर यांनी.